काश्मीर: तारीख बदलली, बर्फवृष्टीत राजकारण आणखी तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:11 AM2024-05-05T06:11:18+5:302024-05-05T06:25:42+5:30
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही.
- प्रशांत शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर : अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार होते, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने बर्फवृष्टीचे कारण देत मतदानाची तारीख २५ मे केली आहे. यावरून काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले आहे. नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने या निर्णयाला विरोध करत आंदोलन केले आहे.
या जागेसाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ अहमद यांच्यात मुख्य लढत आहे.
२०१४ साली अनंतनागमधून मेहबुबा मुफ्ती यांनी विजय मिळवला होता, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत झाली होती. त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसुदी यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसचे गुलाम अहमद मीर दुसऱ्या स्थानावर होते, तर मेहबुबा मुफ्ती तिसऱ्या आणि भाजपचे सोफी युसूफ चौथ्या स्थानावर होते.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
nभौगोलिक विषमता
nमुस्लिम, गुजर-बकरवाल आणि पहाडी मतदार
nकलम ३७० आणि कलम ३५अ हटवणे
२०१९ मध्ये काय घडले?
हसनैन मसुदी
‘एनसी’ - विजयी
४०,१८०
गुलाम अहमद मीर
काॅंग्रेस
३३,५०४