काश्मीरमध्ये पाच भाषांना मिळणार राजभाषेचा दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:56 AM2020-09-03T03:56:19+5:302020-09-03T03:57:01+5:30
डोगरी, हिंदी व काश्मिरी या भाषांच्या समावेशाने स्थानिक नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता होईल. एवढेच नव्हे, तर काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या समानतेचेही ते प्रतीक आहे,
Next
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात उर्दू, काश्मिरी, डोगरी, हिंदी व इंग्रजी या पाच भाषांना राजभाषांचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारने बुधवारी ठरविले. यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक विधेयक मांडण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
डोगरी, हिंदी व काश्मिरी या भाषांच्या समावेशाने स्थानिक नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता होईल. एवढेच नव्हे, तर काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या समानतेचेही ते प्रतीक आहे, असे मूळचे काश्मीरचे असलेले केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.