Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 07:09 AM2020-12-23T07:09:34+5:302020-12-23T07:10:01+5:30

Jammu Kashmir DDC election results 2020: भाजपने जम्मू प्रांतामध्ये आघाडी घेतली. या ठिकाणी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतामध्ये बांदीपाेरा, श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यातील प्रत्येकी एका अशा तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Kashmir: Gupkar alliance has the highest number of seats, BJP is leading in Jammu province, Congress is third | Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

Next

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत गुपकार आघाडीने १०८ तर भारतीय जनता पक्षाने ६० जागांवर विजय मिळविला आहे. हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जम्मू प्रांतात गुपकार आघाडीने ३७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतात भाजपने ३ ठिकाणी विजय मिळविला आहे. कलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष लागले हाेते.
भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची हाेती. एकूण २८० जागांसाठी मतदान झाले हाेते. त्यापैकी ६० जागांवर भाजपने विजय मिळवला, तर गुपकार आघाडीचे सर्वाधिक १०८ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसनेही २२ जागांवर आघाडी मिळवली आहे.
भाजपने जम्मू प्रांतामध्ये आघाडी घेतली. या ठिकाणी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतामध्ये बांदीपाेरा, श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यातील प्रत्येकी एका अशा तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. गुपकार आघाडीने सर्वाधिक ७१ जागा जिंकल्या आहेत. दहशतवाद्यांसाेबत संबंध असल्याच्या आराेपावरून अटक करण्यात आलेल्या वाहीद पारा या पीडीपीच्या युवा नेत्यानेही विजय मिळविला आहे.

कलम ३७० हटविल्यानंतरची पहिलीच निवडणूक
कलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक हाेती. गुपकार आघाडीमध्ये नॅशनल काॅन्फरन्स आणि पीडीपी यासारख्या बलाढ्य स्थानिक पक्षांचे आव्हान हाेते. फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे कट्टर विराेधक भाजपच्या विराेधात एकत्र आले हाेते.

Web Title: Kashmir: Gupkar alliance has the highest number of seats, BJP is leading in Jammu province, Congress is third

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.