काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळली! खुलेआम फिरताहेत दहशतवादी

By admin | Published: April 18, 2017 12:06 PM2017-04-18T12:06:15+5:302017-04-18T12:06:15+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून, पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता

Kashmir has changed situation! Openly terrorists | काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळली! खुलेआम फिरताहेत दहशतवादी

काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळली! खुलेआम फिरताहेत दहशतवादी

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून,  पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झालेले काश्मिरी युवक शस्त्रास्त्रांसह काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर खुलेआम फिरत आहे. या तरुणांना राज्यशासनावर विश्वास राहिला नसून, लष्करासाठीही हे तरुण डोकेदुखी ठरत आहेत. त्यांना स्थानिकांचा पाठिंबा असल्याने लष्करालाही त्यांच्याविरोधात कारवाई करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. काश्मीरमधील शोपियाँ, कुलगाम, पुलवामा आणि अवंतीपोरामध्ये हे दहशतवादी रस्त्यांवरून बंदुका शस्त्रास्त्रे घेऊन भटकत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित वृत्तपत्राने आपल्याकडे यासंदर्भातील छायाचित्रे आणि व्हिडिओ असल्याचा दावाही केला आहे. यामध्ये बरेच काश्मिरी तरुण एके-47  आणि रायफल्स घेऊन एका बागेमध्ये जमल्याचे दिसत आहे. 
गेल्या वर्षी 8 जुलै रोजी लष्कराने बुऱ्हाण वानी या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. तसेच अनेक तरुणांनी दहशतवादाची वाट धरली होती. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युवा दहशतवादी लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले आहेत. बुऱ्हाण वाणीला ठार मारण्यात आल्यापासून सुमारे 200 हून अधिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झाले आहेत.  दक्षिण काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांना बऱ्यापैकी समर्थन मिळत आहे. स्थानिकांकडून त्यांना आसरा आणि अन्नपाणी मिळत आहे. दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्यास त्याठिकाणी दगडफेक आणि आंदोलन केले जात आहे. 
अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही अशीच माहिती दिली आहे.  दक्षिण काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक असून, कारवाईची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. 90 च्या दशकाशी तुलना केली असता स्थानिकांची दहशतवादाबाबतची धारणा बदलली आहे. दहशतवादी आणि हुर्रियतचे नेते स्थानिकांना भरकटवत आहेत.  तसेच सोशल मीडियाही अशा तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.  

Web Title: Kashmir has changed situation! Openly terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.