काश्मिरात घुसखोरांना कंठस्नान

By Admin | Published: August 22, 2016 05:55 AM2016-08-22T05:55:34+5:302016-08-22T05:55:34+5:30

काश्मिरात कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन अतिरेक्यांना रविवारी सुरक्षा दलाने एका चकमकीत ठार मारले.

Kashmir intruders | काश्मिरात घुसखोरांना कंठस्नान

काश्मिरात घुसखोरांना कंठस्नान

googlenewsNext


श्रीनगर : काश्मिरात कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन अतिरेक्यांना रविवारी सुरक्षा दलाने एका चकमकीत ठार मारले. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाडा जिल्ह्यात तंगधार भागात हे अतिरेकी घुसखोरीचा प्रयत्न करीत होते. तिघांना कंठस्नान घातल्यानंतर तीन हत्यारे आणि युद्धसंबंधित अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या भागात अद्यापही तपास मोहीम सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
>श्रीनगर जिल्हा आणि दक्षिण काश्मीरच्या दोन शहरांत संचारबंदी सुरूच आहे. त्यामुळे सलग ४४व्या दिवशी येथे जनजीवन विस्कळीत आहे.
आंदोलक तेल टँकरला लक्ष्य करीत असल्यामुळे येथील तेल टँकरचालकांनी रविवारी हा पुरवठा बेमुदत बंद ठेवला आहे.
>हिंसाचार घडवणाऱ्यांशी कुठलीही तडजोड नाही
काश्मीर हिंसाचारात सहभागी असलेल्या नागरिकांशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती रविवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. गत ६० वर्षांत विकासाचे जे प्रयत्न झाले नाहीत ते प्रयत्न आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले. दगडफेकीत सहभागी लोक हे सत्याग्रही नव्हे, तर आंदोलक आहेत. ते पोलिसांना आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करीत आहेत. पण, संकुचित वृत्तीचे लोक हे पाहू शकत नाहीत. जम्मू शहराच्या बाहेर एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सद्य परिस्थितीबाबत पाकवर टीका केली.

Web Title: Kashmir intruders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.