काश्मीरचा मुद्दा लष्कराच्या मार्गानं सुटणार नाही- बिलावल भुत्तो
By admin | Published: October 5, 2016 08:01 PM2016-10-05T20:01:46+5:302016-10-05T20:07:42+5:30
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे, असं वक्तव्य केलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचे पुत्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे. तसेच काश्मीरचा मुद्दा हा लष्कराच्या मार्गानं न सुटता शांततेच्या मार्गानं सुटू शकतो, असंही टि्वटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे काश्मीर पाकिस्तानचं आहे, असं म्हणणा-या बेनझीर भुत्तो यांच्या पुत्रानेच भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती नांदावी, अशी भूमिका घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भुत्तो परिवाराचा पाकिस्तानच्या राजकारणावर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे बिलावल भुत्तो यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दोन्ही देशांनी सर्वसामान्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारा युद्धाचा विचार त्यागला पाहिजे, असं आवाहन बिलावल भुत्तो यांनी केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी नवाज शरीफ यांनी बोलावलेल्या बैठकीलाही बिलावल भुत्तो उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिलावल भुत्तो यांनी नवाज शरीफांवरही टीका केली आहे. काश्मीरचा मुद्दावर लष्कराच्या मार्गानं तोडगा निघणार नसून, शांततेच्या मार्गानं तो प्रश्न सुटू शकतो, असं उपरोधिक टीका नवाज शरीफांवर केली आहे.
Dear Pakistan & India. This is what war looks like. https://t.co/azKhzKSpy3
— BilawalBhuttoZardari (@BBhuttoZardari) October 5, 2016