काश्मीर विधानसभेचे अधिवेशन रद्द
By admin | Published: January 13, 2016 04:07 AM2016-01-13T04:07:56+5:302016-01-13T04:07:56+5:30
जम्मू-काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. येत्या १८ जानेवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर
Next
जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. येत्या १८ जानेवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवे सरकार स्थापन करण्यात विलंब लागल्याने राज्यात राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते.
‘अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्यात राज्यपाल शासन लागू झाल्यामुळे १८ जानेवारीपासून अधिवेशन होणार नाही,’ असे विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन केव्हा बोलवायचे याचा निर्णय नवे सरकार घेईल, असे गुप्ता म्हणाले. (वृत्तसंस्था)