काश्मीरसह उत्तर भारत गारठला

By Admin | Published: December 22, 2015 02:49 AM2015-12-22T02:49:44+5:302015-12-22T02:49:44+5:30

काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली

Kashmir with North India | काश्मीरसह उत्तर भारत गारठला

काश्मीरसह उत्तर भारत गारठला

googlenewsNext

नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली आणि त्यासोबतच राजधानी श्रीनगरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. इकडे उत्तर भारतातही थंडीने कहर केला आहे. कानपूरमध्ये पारा गोठणबिंदूच्या जवळ पोहोचला आहे.
श्रीनगरमध्ये रविवारी रात्री किमान तापमान उणे ५.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा खाली गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणी गोठले. प्रसिद्ध दल सरोवरही कमी तापमानामुळे गोठले आहे. स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ११ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविण्यात आले.
उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. कानपूर येथे पारा गोठणबिंदूच्या जवळ म्हणजे ०.८ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. कानपूर हे राज्यातील सर्वांत कमी तापमानाचे शहर बनले आहे. उत्तर प्रदेशच्या अन्य शहरांमध्येही थंडीसोबतच धुक्याची चादर पसरली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Kashmir with North India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.