Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:35 PM2022-06-02T21:35:04+5:302022-06-02T21:37:00+5:30

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर आज काश्मिरी पंडितांची बैठक पार पडली. यात काश्मीर सोडून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kashmir Target Killing: A situation similar to 1990 in Jammu and Kashmir? Kashmiri Pandits announce mass exodus | Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

Next

Kashmiri Pandit Target Killing: काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले असून, आता सामूहिक पलायनाच्या तयारीत आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांनंतर आता काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायन करण्याची घोषणा केली आहे. उद्या(3 जून) काश्मिरी पंडित खोऱ्यातून एकत्र स्थलांतर करणार आहेत.

गुरुवारी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काश्मिरी पंडितांनी ठरवले आहे की, ज्या भागात काश्मिरी पंडित आंदोलन करत होते, ते त्वरित बंद करण्यात येईल. काश्मीरमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसमोर आता दुसरा पर्याय उरला नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत सर्व लोकांना बनिहालच्या नवयुग बोगद्याजवळ एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे.

22 दिवसांपासून निदर्शने सुरू 
काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे आंदोलक रंजन झुत्शी म्हणाले की, गेल्या 22 दिवसांपासून सर्वजण आंदोलन करत आहेत. आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. आज विजय कुमार आणि परवा रजनी बाला यांची निर्घृण हत्या झाली. ज्या दिवशी राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्या दिवशी आम्ही सांगितले होते की, आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढा. जसे आम्ही 1990 मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे 3000 कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत. 

अमित शहा उद्या महत्त्वाची बैठक घेणार 
गृहमंत्री अमित शाह उद्या (3 जून) उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंग हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Kashmir Target Killing: A situation similar to 1990 in Jammu and Kashmir? Kashmiri Pandits announce mass exodus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.