Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:13 PM2022-06-03T18:13:37+5:302022-06-03T18:14:22+5:30
Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख Jitan Ram Manjhi यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.
पाटणा - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधताना जर काश्मीर शांत करायचं असेल तर ते बिहारींकडे सोपवा असं विधान केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये १८ मार्चचं ट्विट रिट्विट करताना मांझी यांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, द काश्मीर फाईल्स चित्रपट हा एक दहशतवादी कट आहे. हा चित्रपट दाखवून काश्मीरमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतावादी कारवायांनी माझं म्हणणं खरं ठरवलं आहे. आता मी केवळ एवढंच सांगेन की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर काश्मीर बिहारींकचे सोपवा, सर्व काही ठीक होईल.
तत्पूर्वी जीतनराम मांझी यांनी १८ मार्च रोजी ट्विट करत द काश्मीर फाईल्स हा एक व्यापक कट असू शकतो. हा चित्रपट दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मण पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात येऊ नयेत. दरम्यान, या चित्रपटामधील युनिटच्या सदस्यांच्या दहशतवादी कनेक्शनचीही सरकारकडून तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.