दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:40 AM2021-09-29T05:40:27+5:302021-09-29T05:41:04+5:30
पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा.
नितीन अग्रवाल
बाल्टाल : पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्येपर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केला. श्रीनगर आणि लडाखला जोडणाऱ्या जोजीला बोगद्याच्या कामाची त्यांनी मंगळवारी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत जागतिक दर्जाचे रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार केले जात आहे. हे प्रदेश दावोस आणि स्विर्त्झलंडपेक्षाही सरस असे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येतील. ११,५७५ फूट उंचीवर तयार केला जात असलेल्या जोजीला बोगद्यात एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी आशियातील सर्वांत लांबीचा आणि जगातील सर्वात उंच बोगदा असेल. यामुळे साडेतीन तासांचा प्रवास १५ मिनिटांत पूर्ण होईल. जोजीला बोगद्याचे काम डिसेंबर २०२६ पूर्ण करण्याचे निर्धारित असले तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी अशा आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी, श्रीमती कांचन गडकरी जी और राज्यमंत्री @Gen_VKSingh जी ने श्रीनगर, कारगिल और लेह को ऑल वेदर कनेक्टिविटी प्रदान करने वाली निर्माणाधीन जोजिला टनल का निरीक्षण किया। #PragatiKaHighwaypic.twitter.com/zWZjRJVk2B
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 28, 2021
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जी. एस. कम्बो यांनी सांगितले की, या ठिकाणी खोदकाम आणि स्फोट करण्यासाठी अत्याधुिनक तंत्र आणि स्फोटकांचा वापर केला जात असल्याने काम वेगाने होत आहे.