काश्मिरी पंडितांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकांचं स्वागत; मोदींना सांगितली 'मन की बात' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 10:03 PM2019-12-15T22:03:48+5:302019-12-15T22:04:04+5:30

जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची संघटना असलेल्या पनून काश्मीर यांनी रविवारी संसदेच्या दोन्ही सदनात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं स्वागत केलं आहे.

Kashmiri Pandits welcome citizenship reform bill; Mann Ki Baat told Modi | काश्मिरी पंडितांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकांचं स्वागत; मोदींना सांगितली 'मन की बात' 

काश्मिरी पंडितांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकांचं स्वागत; मोदींना सांगितली 'मन की बात' 

Next

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची संघटना असलेल्या पनून काश्मीर यांनी रविवारी संसदेच्या दोन्ही सदनात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं स्वागत केलं आहे. संपूर्ण राष्ट्र हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर उभं आहे. पनून काश्मीरचे आयोजक अग्निशेखर म्हणाले, संसदेत नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानं भारताच्या राजनैतिक आणि सांस्कृतिक अस्मितेला बळकटी येणार आहे. राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय माणसांनी वसाहतवादातून बाहेर येण्याची गरज आहे. मोदी सरकारद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय म्हणजे वसाहतवादाच्या गुलामगिरीत हिंदूंवर होणारे अत्याचार सुधारण्याचा एक मोठा निर्णय आहे.

नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग शुक्रवारी आणखी वाढली आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. 

Web Title: Kashmiri Pandits welcome citizenship reform bill; Mann Ki Baat told Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.