पूर आल्यावर काश्मिरींना कळते जवानांची किंमत- नरेंद्र मोदी
By admin | Published: April 21, 2017 05:24 PM2017-04-21T17:24:06+5:302017-04-21T18:09:15+5:30
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान केला गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांशी संवाद साधताना सांगितलं की, "तुमच्यापैकी काही लोक जेव्हा काश्मीरमध्ये पूर आल्यानंतर लोकांची मदत करतात तेव्हा टाळ्या वाजवून तुमचं कौतुक केलं जात. नंतर भलेही तुमच्यावर दगडफेक होत असेल, पण काही वेळासाठी त्यांच्याही मनात येतं की हे लोक आपल्यासाठी जीव देऊ शकतात". यावेळी मोदींनी अधिका-यांना सांगितलं की, "तुम्ही ठरवलंत तर सर्व शक्य आहे. जर एका अधिका-याने ठरवलं की गंगेत कोणताही कचरा टाकू दिला जाणार नाही, तर गंगेला कोणीही अस्वच्छ करु शकणार नाही".
अधिका-यांना दिला सल्ला -
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिका-यांना सल्ला देत जर तुम्ही तुमच्या कामाची पद्दत बदललीत तर काही आव्हानांचं रुपांतर संधीत होऊ शकतं. काही गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी आजच्या वेळेत अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना सोशल मीडियाचा वापर करण्याचाही सल्ला दिला. स्वत:चा प्रचार करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाची पद्दत बदलण्यावर भर दिला पाहिजे असं मोदींनी सांगितलं.
#WATCH Live from Delhi: PM Modi speaking at the 11th Civil Services Day function in Vigyan Bhawan https://t.co/lZVLzAvtSo
— ANI (@ANI_news) April 21, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना पुर्ण मेहनतीने काम करण्याचा सल्ला देताना सांगितलं की, सरकार बदलत राहिल पण सिस्टम नेहमीच लागू असले. "आज परिस्थिती बदलण्याची संधी मिळाली आहे. निष्ठेने काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तो दिवस आठवा जेव्हा तुम्ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला होतात. तेव्हा तुम्ही काय स्वप्न पाहिली होती, त्यामध्ये काही बदल झाला आहे का ?" असा विचार करायला मोदींनी सांगितलं. उदाहरण देताना मोदी बोलले की, "फक्त खड्डा खोदणं आणि भरणं याच्याने काही होणार नाही. रोपटंही लावलं पाहिजे. आपण जे काही करु त्याचा निकाल दिसला पाहिजे".
केद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना यावेळी प्रोत्साहन दिले गेले. "सुधारणांबाबत सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती अजिबात कमी नाही. त्यामुळे काहीतरी हटके विचार करा", असं आवाहनही मोदींनी यावेळी केले. "राजकीय इच्छाशक्ती केवळ सुधारणा आणू शकते. मात्र, प्रशासनाचं काम आणि जनतेचा सहभागच खरा बदल करु शकतो. त्यामुळे आपल्याला या सर्वांना एकत्र आणावं लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.