काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:23 PM2019-07-09T17:23:10+5:302019-07-09T17:23:37+5:30

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे.

Kashmiri separatist leader Says, We are Pakistani! Video Viral | काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने केला पाकिस्तानी असल्याचा दावा, व्हिडीओ व्हायरल

Next

श्रीनगर  - काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. दरम्यान, हुर्रियत काँन्फन्स या काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आपण पाकिस्तानी असल्याचा दावा एका भाषणादरम्यान केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे असे गिलानी सांगत असल्याचे या व्हिडीओमधून ऐकू येते. 

गिलानी नावाच्या व्हेरिफाइड नसलेल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ मे महिन्यात शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडीओमध्ये गिलानी हे प्रक्षोभक भाषण देताना दिसत आहेत. यादरम्यान ते सांगतात की, इस्लामवर असलेल्या प्रेमामुळे, इस्लामशी असलेल्या संबंधांमुळे आम्ही पाकिस्तानी आहोत. पाकिस्तान आमचे आहे.'' दरम्यान, ही घोषणाबाजी काही वेळ चालू राहिली. 

 मात्र ही रॅली कधी आणि कुठे आयोजित करण्यात आला होती हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता जर गिलानी हे स्वत:च पाकिस्तानी असल्याचे सांगत असतील तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना पाकिस्तानात पाठवले गेले पाहिजे, असे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. 
 एकीकडे जम्मू काश्मीरचे राज्यपाल फुटीरतावादी हुर्रियतचे नेते केंद्र सरकारसोबत चर्चेस तयार असल्याचे सांगत असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Kashmiri separatist leader Says, We are Pakistani! Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.