काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:19 AM2018-04-03T02:19:13+5:302018-04-03T02:19:13+5:30

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे.

 Kashmiri youth moving towards terrorism - Omar Abdullah | काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

Next

श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. त्यास मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी होत असताना दिल्ली दौरा अर्धवट सोडून मेहबुबा मुफ्ती यांना तात्काळ राज्यात परतावेसे वाटले नाही, अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.
सुरक्षा दलानी पाच महिन्यांत दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात
केली आहे. शोपियानमध्ये आजही
३० दहशतवादी सक्रिय आहे. त्यांच्यापैकी काहींना पकडण्यासाठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. या जिल्ह्यातील सुमारे
५० युवक काही काळापासून बेपत्ता असून, ते दहशतवादाकडे वळले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
रविवारच्या चकमकींनंतर श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सोमवारी संचारबंदी लागू करून, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सय्यद अली शाह गिलानी, मिरवाइझ उमर फारुक, यासिन मलिक या
फुटीर नेत्यांनी काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यातील गिलानी व मिरवाईझ नजरकैदेत आहेत. (वृत्तसंस्था)

भारताची कारवाई पाशवी : पाकचा आरोप

काश्मीरमधील जनतेशी भारत सरकार पाशवी पद्धतीने वागत आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान खकन अब्बास यांनी केला आहे. रविवारी ज्या प्रकारे लोकांना मारण्यात आले, ते पाहता तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे तिथे पाहणी पथक पाठवण्यात यावे. संयुक्त राष्ट्रांनी तसे भारताला कळवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 

Web Title:  Kashmiri youth moving towards terrorism - Omar Abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.