काश्मीरचे पहिले आयएएस टॉपर शाह फैसल यांनी नोकरी सोडली; केंद्रावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:35 PM2019-01-09T19:35:19+5:302019-01-09T19:39:25+5:30
फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
श्रीनगर : काश्मीरचे आयएएस टॉपर राहिलेले 35 वर्षीय शाह फैसल यांनी केंद्र सरकार काय़श्मीबाबत पक्षपात करत असल्याचा आरोप करत सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. शाह हे कुपवाडाचे रहिवासी आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये वारंवार होत असलेल्या हत्यांना विरोध करणारी फेसबूक पोस्ट त्यांनी टाकली आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढताना काश्मीरबाबत केंद्राकडून कोणतीही ठोस राजनैतिक उपाय शोधला जात नाही. यामुळे नाराज असून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, फैसल हे भविष्यात राजकीय क्षेत्रात उतरण्याची चिन्हे आहेत. ते फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल काँन्फरन्स पक्षाकडून नशीब आजमावण्याची शक्यता आहे. काश्मीरचा तरुण एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्याने इतर तरुणही त्यांचा आदर्श मानून प्रशासकीय सेवेच्या परीक्षांची तयारी करत असतानाच फैसल यांनी हा निर्णय धक्का मानला जात आहे.
कोण आहेत फैसल?
फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. फेसबूक पोस्टनुसार ते भविष्यातील वाटचालीचा खुलासा शुक्रवारी करतील. सुत्रांनुसार ते नॅशनल काँन्फरन्समध्ये सहभागी होऊ शकतात. यानंतर ते बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
The bureaucracy’s loss is politics’ gain. Welcome to the fold @shahfaesal. https://t.co/955C4m5T6V
— Omar Abdullah (@OmarAbdullah) January 9, 2019