कासिमवर १० लाखांचे बक्षीस, ट्रकचालकाला कोठडी

By admin | Published: August 23, 2015 03:27 AM2015-08-23T03:27:20+5:302015-08-23T03:27:20+5:30

एनआयएने अबू कासिमला पकडणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अबू हा बहावलपूरला राहणारा पाकिस्तानी नागरिक असून लष्करच्या दक्षिण काश्मीर आॅपरेशनचा कमांडर आहे.

Kasimwar gets 10 lakh prize, trucker locker | कासिमवर १० लाखांचे बक्षीस, ट्रकचालकाला कोठडी

कासिमवर १० लाखांचे बक्षीस, ट्रकचालकाला कोठडी

Next

जम्मू : एनआयएने अबू कासिमला पकडणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अबू हा बहावलपूरला राहणारा पाकिस्तानी नागरिक असून लष्करच्या दक्षिण काश्मीर आॅपरेशनचा कमांडर आहे. त्याच्यावर नावेद व त्याच्या साथीदारांची राहण्याची व इतर व्यवस्था केल्याचा आरोप आहे. नावेद आणि त्याचे तीन सहकारी जून महिन्यात गुलमर्ग क्षेत्रातून काश्मीर खोऱ्यात घुसले होते.
१४ दिवसांची कोठडी
उधमपूर हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद आणि त्याच्या साथीदारास जम्मूत पोहोचविणारा ट्रकचालक खुर्शीद अहमद भट याला शनिवारी न्यायालयाने १४ दिवस राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविले. एनआयएने खुर्शीदला शुक्रवारी अटक केली होती. त्याला पहाटे कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
शाळेजवळ आयईडी
सुरक्षा दलाने दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्णात एका शाळेजवळ पेरण्यात आलेला आयईडी शोधून काढला. दहशतवाद्यांनी महीपोरा गावात हा आयईडी पेरून ठेवला होता. गस्ती पथकाने तो शोधून काढल्यानंतर बॉम्ब स्क्वॉडला सूचना देण्यात आली व त्यानंतर तो निष्क्रिय करण्यात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: Kasimwar gets 10 lakh prize, trucker locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.