Corona Vaccine : कोरोना लसीमुळे नपुंसकता?; लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:04 PM2021-08-17T16:04:19+5:302021-08-17T16:10:36+5:30
BJP Sanjay Pathak And Corona Vaccine : भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही अनेकांच्या मनात लसीबद्दल भीती असल्याने ते लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. याच दरम्यान लोकांची लसीकरणाबाबतची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराने एक अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कोरोना लसीवर (Corona Vaccine) पसरलेल्या अफवांच्या दरम्यानच मध्य प्रदेशातील कटनीच्या विजयराघवगडचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'अनेक मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत की कोरोना लस नपुंसकत्व आणेल, पण असे काहीही घडत नाही. मी देखील लस घेतल्यानंतर टेन्शनमध्ये होतो आणि त्यानंतर 3-4 महिन्यांनी स्वत: ची तपासणी केली असता काहीच झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे.
ये है भाजपा के पूर्व मंत्री संजय पाठक जी…?
— Narendra Saluja (@NarendraSaluja) August 17, 2021
ये वैक्सीन लगवाकर टेंशन में आ गये थे , फिर इनका टेंशन तीन- चार माह बाद दूर हुआ…? pic.twitter.com/ZcJba0hLty
माजी मंत्री संजय पाठक यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्ही टेन्शन होऊ नका आणि कोणत्याही गोष्टी मनावर घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत, लसीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येकजण सुरक्षित असेल असं देखील म्हटलं आहे. पाठक यांच्या या विधानाचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 154 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; 154 दिवसांनी दिलासा#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/nRkh2RIicL
— Lokmat (@MiLOKMAT) August 17, 2021
सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (17 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,69,846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 97.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.
CoronaVirus Live Updates : चिंताजनक! लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; एका दिवसात 138 जणांना लागण#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19Indiahttps://t.co/xfByf8yusv
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2021