गोल बाजारातील अतिक्रमण काढले काटोल नगर परिषदेची कारवाई : गाळ्यासमोरील १० फूट जागा मोकळी
By admin | Published: October 21, 2016 12:18 AM2016-10-21T00:18:21+5:302016-10-21T00:18:21+5:30
काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली.
Next
क टोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली. शहरातील गोल बाजारातील गाळ्यासमोर काहींनी टिनपत्र्यांचे शेड उभारून अतिक्रमण केले होते. त्यामुळे दुकानदारांसोबतच नागरिकांनाही या अतिक्रमणाचा त्रास व्हायचा. हा त्रास वाढल्याने नागरिकांनी सदर अतिक्रमण संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करून सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्याची सूचना केली होती. त्यासाठी संबंधितांना पुरेसा अवधीही देण्यात आला होता. या नोटीसची दखल घेत काही दुकानदारांनी त्यांची दुकाने हटविली. परंतु, शास्त्री चौक व जयस्वाल संकुल परिसरातील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण काढायला सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ७० दुकानांसमोरील अतिक्रमण काढण्यात आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस चालणार आहे. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिवाय, पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे दुकानदारांसोबतच ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)***