Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 02:17 PM2023-06-03T14:17:32+5:302023-06-03T14:19:00+5:30

हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. पण...

Kavach Technology: if indian railways kavach technology existing in the train, then such a big train accident would not have happened in Odisha Know the specialty | Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

googlenewsNext

ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील रेल्वेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बालासोरम येथील रेल्वे अपघातानंतर, रेल्वेचे एक संरक्षण कवच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या कवचाचे गेल्या वर्षीच उद्घाटन झाले होते. खरे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच रेल्वेने हे 'कवच' तयार करून घेतले होते. हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. मात्र यातच, बालासोरमधील दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे.

'कवच'चे झाले होते यशस्वी परीक्षण -
तेव्हा रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेचे हे कवच म्हमजे मास्टर स्ट्रोक आणि मोठी क्रांती मानले जात होते. एवढेच नाही, तर रेल्वेने असे तंत्रज्ञा विकसित केले आहे, ज्यामुळे एकाच पटरीवर ट्रेन समोरा-समोर आल्या तरीही अपघात होणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात होते. तसेच, ही 'कवच' टेक्नॉलॉजी (Kavach Technology) लवकरच देशातील सर्वच रेल्वे ट्रॅक आणि सर्व रेल्वे गाड्यांमध्ये इंस्टाल केली जाईल, असे तेव्हा स्वतः सरकरने म्हटले होते.

मार्च 2022 मध्ये झालेल्या कवच तंत्रज्ञानाच्या चाचणी वेळी एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन ट्रेनपैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बसले होते, तर दुसऱ्या ट्रेनच्या इंजिनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बसले होते. यावेळी, एकाच ट्रॅकवर समोरा समोरून येणारी ट्रेन आणि इंजिन यांच्यात 'कवच' तंत्रज्ञानामुळे अपघात झाली नाही, कारण कवचने रेल्वेमंत्र्यांची ट्रेन समोरून येणाऱ्या इंजिनापासून 380 मीटर अंतरावर थांबवली होती. अशा प्रकारे परीक्षण यशस्वी ठरले होते.

काय म्हणाले होते रेल्वे मंत्री -
यशस्वी ट्रायलनंतर, रेल्वे मंत्री म्हणाले होते, जर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरा समोर असती, तर Kavach टेक्नोलॉजी ट्रेनची स्पीड कमी करून इंजिनला ब्रेक लावते. यामुळे दोन्ही ट्रेन एकमेकांवर धडकण्यापासून वाचतील. 2022-23 मध्ये कवच टेक्नॉलॉजी 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्कवर वापरात आणली जाईल. यानंतर दर वर्षी 4000-5000 किलोमीटर नेटवर्क जोडले जाईल. 

आरडीएसओने केले होते डेव्हलप -
ही कवच टेक्नोलॉजी देशातील तीन व्हेडर्सच्या सोबतीने मिळून आरडीएसओ (RDSO) डेव्हलप केली होती. महत्वाचे म्हजे, RDSO ने याच्या वापरासाठी ट्रेनची स्पीड लिमिट जास्तीत जास्त ताशी 160 किलोमीटर निश्चित केली होती. या सिस्टिममध्ये  'कवच'चा संपर्क पट्रीबरोबरच ट्रेनच्या इंजिनसोबत येतो. पट्रिसोबत याचे एक रिसिव्हर असते. तसेच ट्रेनच्या इंजिनमध्ये एक ट्रान्समीटर लावले जाते. यामुळे ट्रेनचे परफेटक्ट लोकेशन समजते. 

 

Web Title: Kavach Technology: if indian railways kavach technology existing in the train, then such a big train accident would not have happened in Odisha Know the specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.