तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 06:41 PM2024-03-15T18:41:02+5:302024-03-15T18:44:45+5:30
अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना हैदराबादमधून ताब्यात घेतले असून, दिल्लीला आणले जात आहे.
KCR Daughter Kavitha Arrest: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांची मुलगी आणि आमदार के कविता (K Kavitha) यांना ताब्यात घेतले आहे. अटक करून आता कविता यांना चौकशीसाठी दिल्लीत आणले जाईल.
BRS MLC K Kavitha will be further questioned in Delhi by the ED: Sources https://t.co/n3PI1visXy
— ANI (@ANI) March 15, 2024
'दक्षिण ग्रुप'शी संबंधित असल्याचा आरोप
शुक्रवारी ईडीच्या पथकाने के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडी टीमसोबत आयकर अधिकारीही उपस्थित होते. ईडीच्या या छाप्यापूर्वी कविता तपास यंत्रणेच्या अनेक समन्सवर हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळेच त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. आता आज अखेर त्यांना अटक करण्यात आले. दरम्यान, दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यात ईडीने कविता यांची यापूर्वी चौकशी केली आहे. ईडीने दावा केला होता की, कविता मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबी 'साउथ ग्रुप'शी जोडलेल्या आहेत.
कविता आप नेत्याच्या संपर्कात
या प्रकरणातील आरोपी अमित अरोडाने चौकशीदरम्यान कविता यांचे नाव घेतले होते. तेव्हापासून ईडी कविता यांच्या मागे लागली. याशिवाय, 'आप'चे संपर्क प्रमुख विजय नायर यांच्याशी असलेल्या कथित संबंधांप्रकरणी ईडीने कविता यांना गेल्या वर्षी पहिल्यांदा समन्स बजावले होते. कविता, नायरच्या सतत संपर्कात होत्या, असा आरोप आहे.