केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:43 AM2018-12-07T06:43:22+5:302018-12-07T06:43:34+5:30

टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती.

KCR has betrayed the public | केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात

केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात

Next

हैदराबाद : टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आहे. आता याला उत्तर म्हणून जनता काँग्रेस, टीडीपी, टीजेएस व सीपीएम आघाडीला पर्याय म्हणून बघत आहे, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
तेलंगणाच्या निर्मितीसाठी आम्ही योगदान दिले आहे, असे सोनिया गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ तयार करून काँग्रेसने तो सोशल मीडयावर टाकला.
टीआरएसचेच सरकार
जनतेचा टीआरएस आणि केसीआर यांना पाठिंबा आहे. त्यामुळे टीआरएसला सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या मदतीची गरज भासणार नाही, ते बहुमताने विजयी होतील, असे एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यास हटवले
काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांना जबरदस्तीने अटक करणाºया एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाºयास हटविल्याचे निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले आहे.

Web Title: KCR has betrayed the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.