Kedarnath: नमो नमो जी शंकरा! जर्मनीहून आलं तांबं-पितळ; केदारनाथमध्ये ५० टन वजनाचं 'ॐ' चिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 06:02 PM2023-05-16T18:02:55+5:302023-05-16T18:03:14+5:30
Kedarnath Dham, Om Sign: सुमारे डझनभर तुकड्यांना जोडून तयार करणार प्रेरणादायी 'ॐ'
Kedarnath Temple, Om Sign: केदारनाथमंदिराच्या चबुतऱ्यावर ५० टन वजनाचे 'ॐ' चिन्ह लावले जाणार आहे. सोमवारी या संबंधीची माहिती देण्यात आली. साधारण दोन आठवड्यांत हे कार्य पूर्णत्वास नेले जाईल असेही सांगण्यात आले. केदारनाथमंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवल्यानंतर, मंदिरात सुवर्ण कलश आणि छत्र बसवण्यात आले होते. त्यानंतर आता धाममध्ये चबुतऱ्यावर 50 टन वजनाचे 'ॐ' चिन्ह बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठीचे काम सुरू झाले आहे.
जर्मनीहून आलेल्या तुकड्यांनी बनवले जाणार 'ॐ' चिन्ह
'ॐ' हे ५० टन वजनाचे चिन्ह ट्रॅक्टरच्या सहाय्याने केदारनाथ धामला नेण्यात आले. डझनहून अधिक तुकड्या जोडून ते तयार करण्यात आले आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची चाचणी घेण्यात आली. केदारनाथ मंदिरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चबुतऱ्यावर ते चिन्ह बसवण्यात येणार आहे.
तांबे आणि पितळ यांचे मिश्रण करून ते तयार करण्यात आले आहे. ते जर्मनीतून आयात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 'ॐ' चे हे चिन्ह भक्तांना प्रेरणा देईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र झिनकन यांनी सांगितले की, 'ॐ' चिन्ह बसविण्याची चाचणी घेण्यात आली आहे, जी यशस्वी झाली. आता हे चिन्ह सुमारे दोन ते तीन आठवड्यांत लावले जाईल.
नऊ वर्षांच्या आपत्तीनंतर गुरु ईशानेश्वराला घर मिळणार!
केदारनाथ दुर्घटनेच्या नऊ वर्षांनंतर भगवान शिवाचे उपासक गुरु ईशानेश्वर यांना निवासस्थान मिळणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मोकळ्या आकाशाखाली देवाच्या मूर्तींची पूजा केली जात आहे. ईशानेश्वर महादेवाची पूजा करण्यापूर्वी बाबा केदार यांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. हे सुख-समृद्धी आणि वैभवाचेही प्रतीक मानले जाते. केदारनाथ धाममध्ये असलेले ईशानेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. जगप्रसिद्ध धाम केदारनाथ धामचे मंदिर पांडवांनी बांधले होते असे सांगितले जाते.
आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार केला होता, पण केदारनाथ मंदिराच्या ईशान्य कोपर्यात केदारनाथ मंदिरापूर्वी केदारनाथचे गुरू ईशानेश्वर महादेव यांचे मंदिर बांधण्यात आले. असे मानले जाते की ज्याप्रमाणे कोणत्याही घराचा पाया घालण्यापूर्वी ईशान्य दिशेला वास्तुपूजा केली जाते, त्याचप्रमाणे केदारनाथ मंदिराच्या उभारणीपूर्वी ईशानेश्वर महादेवाचे मंदिर ईशान्य कोपर्यात बांधले गेले होते. आजही परंपरेनुसार केदारनाथ मंदिरात दररोज पूजेपूर्वी ईशानेश्वर महादेवाची पूजा केली जाते, मात्र 2013 साली हे मंदिर ढिगाऱ्याखाली गेल्यामुळे नष्ट झाले होते.