पक्ष्यांसाठी धान्य,पाणी ठेवा उपक्रम: हरित सेनेतर्फे भांडे वाटप
By Admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:54+5:302016-03-15T00:34:54+5:30
जळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे जंगलाकडे जातात पण तेथेही पाणी समस्या ही आहेच. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शहरातील चौका,चौकात मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला.
ज गाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे जंगलाकडे जातात पण तेथेही पाणी समस्या ही आहेच. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शहरातील चौका,चौकात मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला. उन्हाच्या चटक्यांचा दाह आता सर्वत्र जाणवतो आहे. त्यातच यंदा पाणी टंचाईही भीषण आहे. हे लक्षात घेऊन पक्ष्यांना या परिस्थितीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना पाणी द्या, दाणे द्या असा संदेश देत राष्ट्रीय हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी चौका,चौकात उभे राहून नागरिकांना मातीचे भांडे वाटप केले. सुमारे २०० भांडे या उपक्रमात वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, कुंभार समाजाचे सचिव सखाराम मोरे, क्रीडा शिक्षक दीपक आर्डे, हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, अध्यक्ष सोनवणे उपस्थित होते. होळीसाठी उपक्रमपाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन यंदा पर्यावरण पुरक होळी साजरी करावी असे आवाहन हरित सेनेतर्फे करण्यात आले असून तशी जनजागृती केली जाणार असल्याचे प्रवीण पाटील यांनी कळविले आहे.