जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित ठेवा लष्कर दिन : लष्करप्रमुखांचा आरोप
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:40+5:302015-01-15T22:32:40+5:30
नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़
Next
न ी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़येथे आयोजित ६७ व्या लष्कर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ सरलेले वर्ष लष्करासाठी आव्हानात्मक ठरले़ मात्र, लष्कराने सीमेवरील शत्रूंच्या कारवाया हाणून पाडल्या़ अंतर्गत सुरक्षेची आव्हानेही लष्कराने यशस्वीपणे पेलली, अशा शब्दांत त्यांनी जवानांनी दाखविलेल्या अपार शौर्याची प्रशंसा केली़जम्मू-काश्मिरातील जनतेचा सुरक्षा दलांवरील विश्वास वाढला आहे़ राज्यातील ताज्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, हा त्याचा परिपाक आहे़ भविष्यात संगणकीय युद्धाचे आव्हान लष्करासमोर आहे़ या आव्हानालाही तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने चालवली आहे, असे सिंह यावेळी म्हणाले़जवानांच्या कल्याणकारी योजनांवर सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल आणि दीर्घ काळापासून रखडलेला समान दर्जा, समान वेतनाची मागणी लागू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला़ ---------------लष्कराच्या अपार शौर्याची पंतप्रधानांकडून प्रशंसाभारतीय लष्कराने दाखवलेले अपार शौर्य आणि बलिदानास मी सलाम करतो़ लष्कराचा त्याग, बलिदान आणि समर्पणावर संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे़ दरवर्षी १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो़