मोबाइल दूर ठेवा, अन्यथा ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; तरुणांमध्ये मान, पाठीचे दुखणे २०% वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:15 IST2025-04-05T10:15:01+5:302025-04-05T10:15:42+5:30

Text Neck Syndrome: मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. १४ ते २४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुण या समस्येचे सर्वाधिक बळी ठरत आहेत.

Keep your mobile away, otherwise you will get 'text neck syndrome'; Neck and back pain increased by 20% among youth | मोबाइल दूर ठेवा, अन्यथा ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; तरुणांमध्ये मान, पाठीचे दुखणे २०% वाढले

मोबाइल दूर ठेवा, अन्यथा ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; तरुणांमध्ये मान, पाठीचे दुखणे २०% वाढले

नवी दिल्ली -  मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. १४ ते २४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुण या समस्येचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. टेक्स्ट नेक सिंड्रोम’मध्ये मान आणि खांदे दुखणे, डोकेदुखी आणि मान अवघडणे, मुंग्या येणे किंवा हात सुन्न होणे अशी लक्षणे दिसत असून, किशोरवयीन आणि तरुणांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मान आणि पाठीच्या वरच्या भागाच्या दुखण्यांमध्ये १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फिजिओथेरपिस्ट डॉ. हेमंत व्यास यांच्या मते, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसच्या केसमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. (वृत्तसंस्था)

टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे? 
त्याला टेक नेक किंवा स्मार्टफोन नेक असेही म्हणतात. मोबाइलचा अतिवापर, चुकीच्या आसनामुळे ही स्थिती उद्भवते. 

दोन गंभीर प्रकरणे
केस १: १२ वर्षांचा विद्यार्थी महेश (नाव बदलले) याला टेक्स्ट नेक सिंड्रोम झाला. तो मोबाइल आणि लॅपटॉपवर बराच वेळ वाकलेल्या स्थितीत बसत असे.
केस २ : यूपीएससीची तयारी करत असलेला रौचकला मायोफेशियल सिंड्रोमने ग्रासले. त्यामुळे दोन वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करता आली नाही.

४६.२ कोटी
सक्रिय सोशल मीडिया वापरकर्ते भारतात आहेत. एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण ३२.२ टक्के आहे.

उपाय काय? 
मोबाइल आणि डोळे यात योग्य ते अंतर ठेवा.
तुमची मान आणि खांदे ताणण्यासाठी दर २०-३० मिनिटांनी ब्रेक घ्या.
ताठ बसा आणि डिव्हाइसचा वापर मर्यादित करा.
फिजिओथेरपिस्टचा सल्ला अवश्य घ्या.

Web Title: Keep your mobile away, otherwise you will get 'text neck syndrome'; Neck and back pain increased by 20% among youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.