मंत्रिमंडळ विस्तार निवडणुका लक्षात ठेवूनच
By admin | Published: July 6, 2016 03:35 AM2016-07-06T03:35:40+5:302016-07-06T03:35:40+5:30
निवडणुकीत यश मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माझे सरकार कोणताही निर्णय घेत नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी मुलाखतीद्वारे अलीकडेच दिली खरी, मात्र त्यांनी दुसरा मंत्रिमंडळ
नवी दिल्ली : निवडणुकीत यश मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माझे सरकार कोणताही निर्णय घेत नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी मुलाखतीद्वारे अलीकडेच दिली खरी, मात्र त्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार विविध राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवूनच केला. नव्या मंत्र्यांमध्ये राजस्थानच्या चार तर उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेशच्या प्रत्येकी ३ राज्यमंत्र्यांचा समावेश मुख्यत्वे त्यांच्या जाती-जमातींच्या व्होट बँका लक्षात घेऊनच केला.
महाराष्ट्रातील दोघे
रामदास आठवले (५६) मंत्रिमंडळात आंबेडकरी चळवळीतला एकमेव नवबौद्ध चेहरा, महाराष्ट्रात दलित पँथर चळवळीपासून सक्रिय राजकारणात सहभाग, शरद पवार मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री
डॉ. सुभाष भामरे (६६) धुळ्याचे खासदार, मंत्रिमंडळातील रावसाहेब दानवेंच्या रिक्त जागेवर मराठा समाजाचे प्रतिनिधी
एम.जे. अकबर (६५) नामवंत पत्रकार, भाजपाचे प्रवक्ते, सध्या मध्य प्रदेशचे राज्यसभा सदस्य व भाजपाचा मुस्लीम चेहरा
सी.आर. चौधरी (६८) राजस्थानच्या नागौर मतदारसंघाचे खासदार, ग्रामविकास विषयात बर्मिंगहॅम विद्यापीठाचे स्नातक
विजय गोयल (६२) दिल्लीतील भाजपा नेते, वाजपेयी सरकारमधे राज्यमंत्री, सध्या राजस्थानचे राज्यसभा सदस्य
अनिल माधव दवे (६0) मूळचे आणंदचे, संघाचे प्रचारक, मध्य प्रदेशातून राज्यसभा सदस्य, वक्ते व लेखक
अनुप्रिया पटेल (३५) उत्तर प्रदेशात कुर्मी पटेल समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्व. सोनेलाल यांच्या कन्या, अपना दल नेत्या.
अर्जुन राम मेघवाल (६२) माजी आयएएस अधिकारी, कालपर्यंत भाजपाचे लोकसभेतील प्रतोद, राजस्थानच्या दलितांचे प्रतिनिधी
रमेश चंदप्पा जिगाजिनागी (५२) भाजपाचे कर्नाटकातील दलित नेते, विजापूर मतदारसंघातून ५ वेळा लोकसभेवर निवड.
पुरुषोत्तम रूपाला (६१) सौराष्ट्रात पटेल समाजाचे प्रमुख नेते, अमित शाह यांचे निकटवर्ती राज्यसभा सदस्य
राजन गोहेन (६५) आसामच्या नौगावचे लोकसभा खासदार, सर्बानंद सोनोवाल यांच्या रिक्त जागेवर आसामचे प्रतिनिधित्व
फग्गनसिंग कुलस्ते
(५७) अनुसूचित जमातीतील आदिवासी नेते, मध्य प्रदेशच्या मंडलाचे खासदार, वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री, ‘नोट फॉर व्होट’ वादग्रस्त प्रकरणात सहभागी
जसवंतसिंग भाभोर
(५९) गुजरातमधील दाहोद मतदारसंघाचे खासदार असलेला हा नेता अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करतो. शेतकरी आणि समाजसेवक हीच त्यांची ओळख.
कृष्णा राज (४९)
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या दुसऱ्यांदा खासदार, भू संपादन विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्य, भाजपाच्या दलित नेत्या.
अजय टम्टा (४३)
अल्मोडाचे खासदार, उत्तराखंडातील
तरुण दलित नेते. उत्तराखंडामधील भाजपा व दलितांमध्ये महत्त्वाचे असलेले स्थान हे त्यांच्या मंत्रिपदाचे रहस्य.
महेंद्रनाथ पांडे (५८) वाराणसीजवळच्या चंदौली मतदारसंघाचे खासदार, उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाचे नेते, हिंदी विषयाची डॉक्टरेट, पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण
मनसुखभाई मंडाविया (४४) गुजरातचे राज्यसभा सदस्य, प्रदेश भाजपाचे महासचिव, पंतप्रधान मोदी आणि शाह यांचे निकटवर्ती, संसदेच्या रिअल इस्टेट प्रवर समितीचे सदस्य
पी.पी. चौधरी (६२) पाली राजस्थानचे खासदार, ४ लाखांहून अधिक मतांनी लोकसभा निवडणुकीत विजय, लाभाचे पद विषयावर नियुक्त संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष
एस.एस. अहलुवालिया (६५) माजी संसदीय कार्य राज्यमंत्री, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दार्जिलिंगचे लोकसभा सदस्य, भाजपाचा शीख समुदायातील एकमेव चेहरा
शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात मंत्र्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, लवकरच संसदेचे अधिवेशन आहे. त्याला सामोरे जाण्यापूर्वी आपापल्या विभागाचे कामकाज समजावून घ्या. स्वागताचे हारतुरे नंतर घ्या. पंतप्रधानपद स्वीकारतांना मीही नवखा होतो. पहिले ४ महिने विविध विभागांचे कामकाज समजावून घेण्यात घालवले होते.
केंद्रीय मंत्रिमंडळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, अणुऊर्जा विभाग, अंतराळ
कॅबिनेट मंत्री
राजनाथसिंह : गृह
सुषमा स्वराज : परराष्ट्र व्यवहार
अरुण जेटली : वित्त व उद्योग
एम. व्यंकय्या नायडू : नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन, माहिती व प्रसारण
नितीन जयराम गडकरी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलवाहतूक,
मनोहर पर्रीकर : संरक्षणमंत्री,
सुरेश प्रभू : रेल्वे, डी.व्ही. सदानंद गौडा- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी,
उमा भारती : जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्याक
रामविलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
कलराज मिश्र : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग । मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण । अनंत कुमार : रसायने व खते, संसदीय कामकाज । रविशंकर प्रसाद : विधि आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान
जे. पी. नड्डा : आरोग्य व कुटुंब कल्याण
अशोक गजपती : नागरी उड्डयन
अनंत गिते : अवजड व सार्वजनिक उद्योग
हरसिमरत कौर बादल : अन्नप्रक्रिया
नरेंद्रसिंह तोमर : ग्रामविकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता
चौधरी बिरेंद्रसिंग : पोलाद
जुएल ओराम : आदिवासी व्यवहार
राधामोहनसिंह : कृषी, शेतकरी कल्याण
थावरचंद गहलोत : सामाजिक न्याय व सबलीकरण
स्मृती इराणी : वस्त्रोद्योग
हर्षवर्धन : विज्ञान आणि तंत्रज्ञान
प्रकाश जावडेकर : मनुष्यबळ विकास
राज्यमंत्र्यांची खाती
(स्वतंत्र कार्यभार)
राव इंदरजीत सिंग : नियोजन तसेच नगरविकास व शहरी दारिद्र्य निर्मूलन
बंडारू दत्तात्रेय : कामगार व रोजगार
राजीव प्रताप रुडी : कौशल्यविकास आणि उद्योजकता
विजय गोयल : युवक आणि क्रीडा, जलसंपदा, नदीविकास व गंगा पुनरुज्जीवन । श्रीपाद नाईक : आयुष
पीयूष गोयल : उर्जा, अपारंपरिक उर्जा, कोळसा । धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम
डॉ. जीतेंद्र सिंग : ईशान्येकडील राज्यांचा विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक पेन्शन व जनतक़ारींची सुनावणी
निर्मला सीतारामन : वाणिज्य व उद्योग
महेश शर्मा : सांस्कृतिक कार्य व पर्यटन
मनोज सिन्हा : दूरसंचार (स्वतंत्र कार्यभार) आणि रेल्वे राज्यमंत्री
अनिल माधव दवे : पर्यावरण आणि वने
राज्यमंत्री
जनरल व्ही.के.सिंग : परराष्ट्र व्यवहार
संतोषकुमार गंगवाल : वित्त
मुख्तार अब्बास नकवी : अल्पसंख्याक व्यवहार व सांसदीय कार्य
एस.एस.अहलुवालिया : कृषी आणि सांसदीय कार्य । रामदास आठवले : सामाजिक न्याय व सबलीकरण
रामकृपाल यादव : ग्रामविकास
हरीभाई चौधरी, गिरीराज सिंह : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
किरेन रिजिजू, हंसराज अहीर : गृह
जी.एम.सिद्धेश्वर : अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
रमेश जिगाजिनागी : पाणीपुरवठा व स्वच्छता । राजेश गोहेन : रेल्वे
पुरुषोत्तम रुपाला : कृषी, पंचायती राज
एम.जे.अकबर : परराष्ट्र व्यवहार
उपेंद्र कुशवाह : मनुष्यबळ विकास
पी.राधाकृष्णन : भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज वाहतूक । कृष्णन पाल : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
जसवंतसिंह भाबोर : आदिवासी विकास
संजीवकुमार बलियान : जलसंपदा आणि नदीविकास । सुदर्शन भगत : कृषी । विष्णुदेव साई : पोलाद
वाय.एस.चौधरी : विज्ञान व तंत्रज्ञान
जयंत सिन्हा : नागरी विमान वाहतूक
राजवर्धन राठोड : माहिती आणि प्रसारण
बाबूल सुप्रियो : नगरविकास, गृहनिर्माण
साध्वी निरंजन ज्योती :अन्नप्रक्रिया उद्योग
विजय सांपला : सामाजिक न्याय व सबलीकरण । अर्जून राम मेघवाल : वित्त व कंपनी व्यवहार । अजय टम्टा : वस्रोद्योग । डॉ.महेंद्रनाथ पांडे : मनुष्यबळ विकास
कृष्णा राज : महिला व बालकल्याण
मनसुख मांडविया : भृपृष्ठ वाहतूक आणि जहाज वाहतूक
अनुप्रिया पटेल, फग्गनसिंग कुलस्ते : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
सी.आर.चौधरी : ग्राहक कल्याण आणि अन्न व नागरी पुरवठा
पी.पी.चौधरी : विधी व न्याय, माहिती-तंत्रज्ञान । डॉ.सुभाष भामरे : संरक्षण.