केजरीवाल यांना ‘जी हुजुरी’ करणारे आवडतात

By admin | Published: April 5, 2015 02:07 AM2015-04-05T02:07:24+5:302015-04-05T02:07:24+5:30

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करण्यास आतुर होते

Kejariwal loves 'ji hujuri' | केजरीवाल यांना ‘जी हुजुरी’ करणारे आवडतात

केजरीवाल यांना ‘जी हुजुरी’ करणारे आवडतात

Next

आपमधील धुमश्चक्री : प्रशांत भूषण यांचा आरोप; काँग्रेसशीही हातमिळवणीची होती तयारी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करण्यास आतुर होते आणि यासाठी त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचीही तयारी केली होती, असा खळबळजनक आरोप या पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण यांनी केला आहे.
भूषण यांनी केजरीवाल यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी केजरीवाल यांच्यावर आरोपांच्या अक्षरश: फैरी झाडल्या आहेत.
केजरीवाल यांच्या कार्यशैलीची तुलना रशियाचे हुकूमशहा स्टॅलिन यांच्याशी करताना त्यांनी असे म्हटले की, त्यांचीही आपल्या कार्यकर्त्यांसोबतची वागणूक निरंकुश राहिली आहे. त्यांच्या विचाराशी असहमती दर्शविणाऱ्यास आपमध्ये स्थान नाही.
केजरीवाल यांच्यासोबत वादावादीनंतर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना गेल्या ४ मार्च रोजी झालेल्या बैठकीत पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून हाकलण्यात आले होते. पुढे २८ मार्चच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत या नेतेद्वयांसह आनंदकुमार आणि अजित झा यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला. एवढ्यावरच ही कारवाई थांबली नाही तर यादव, भूषण यांना प्रवक्ते पदावरूनही काढण्यात आले.
(वृत्तसंस्था)

४या देशातील युवापिढीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपची स्थापना करण्यात आली होती. पर्यायी राजकारणाच्या शोधात असलेल्या या युवकांनी पक्षाला संपूर्ण सहकार्य केले; परंतु त्यांनाही धोका देण्यात आला. इतर पक्षांप्रमाणे आपही पक्षश्रेष्ठी संस्कृती असलेला पक्ष झाला असून केजरीवाल पूर्णपणे दरबारींच्या चौकडीत अडकले आहेत, अशी खंत भूषण यांनी व्यक्त केली आहे.
४भूषण यांनी या पत्रात पक्षातून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले नसले तरी ज्या पद्धतीने त्यांनी पत्राच्या शेवटी ‘गुडबाय’ आणि ‘गुडलक’ असा उल्लेख केला आहे त्यावरून त्यांनी पक्षाला दिलेली ही सोडचिठ्ठी आहे, असे समजले जात आहे.

४‘आम आदमी पार्टीचे जे पानदान तुम्ही वाजवताय त्याबद्दल इतिहास तुम्हाला कदापि क्षमा करणार नाही. तुमच्या या वागणुकीमुळे स्वच्छ राजकारणाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.’
प्रशांत भूषण, संस्थापक सदस्य, आप

Web Title: Kejariwal loves 'ji hujuri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.