केजरीवाल- अमरिंदर सिंग यांच्यात आता ट्विटर वॉर
By Admin | Published: October 24, 2016 07:29 PM2016-10-24T19:29:42+5:302016-10-24T20:34:38+5:30
सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यात सत्ताधारी अकाली दलाविरोधात वातावरण असल्याने दोन्ही पक्षांना पंजाबची सत्ता काबीज करण्याचे वेध लागले आहेत. त्यावरून काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमकी उडत असून, सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली.
सोमवारी सकाळी केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर ते विक्रम सिंग मजिठिया यांनी ड्रग्ज विक्रीतून आलेल्या पैशातून प्रचार करत असल्याचा आरोप ट्विटरवरून केला. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी तुमच्या रोजच्या नाटकांना लोक वैतागल्याचे ट्विट करत केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना खुल्या वादविवादाचे आव्हानही दिले.
यावेळी केजरीवाल यांनी थेट सोनिया आणि राहुल गांधींसोबतही चर्चा करण्याची तयारी दर्शवली. तसेच अमरिंदर सिंग यांना भाजपावाले पाठिंबा देत असल्याचाही आरोप केला. त्यावर वैतागलेल्या अमरिंदर सिंग यांनी आता तुम्ही डोनाल्ड ट्रम्प हेही तुमच्याविरुद्धच्या कटात माझ्यासोबतच्या कटात सामील आहेत, असा टोला केजरीवालांना लगावला.
सर, अच्छा होता आप हमारी पंजाब टीम से debate को तैयार हो जाते। ख़ैर, आपकी मर्ज़ी। पर सर, सारी BJP की फ़ौज आपको क्यों defend कर रही है? https://t.co/lMcudF31O9
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 24, 2016
Morning you started with Majithia,now you're bringing in BJP,next you'll say Donald Trump is conspiring with me against you. https://t.co/jiK22ycMQD
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) October 24, 2016