जगातील ५० महान नेत्यांत केजरीवाल
By admin | Published: March 26, 2016 12:56 AM2016-03-26T00:56:50+5:302016-03-26T00:56:50+5:30
फॉर्च्युन नियतकालिकाने जगातील ५० महान नेत्यांच्या आपल्या यादीत नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा समावेश केला आहे. या यादीत स्थान मिळविणारे
न्यूयॉर्क : फॉर्च्युन नियतकालिकाने जगातील ५० महान नेत्यांच्या आपल्या यादीत नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा समावेश केला आहे. या यादीत स्थान मिळविणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत. पहिले स्थान अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांना मिळाले आहे.
फॉर्च्युनच्या ‘वर्ल्डस् ५० ग्रेटेस्ट लीडर्स’ या तिसऱ्या वार्षिक यादीत जगात बदल घडवू पाहणाऱ्या व इतरांनाही त्यांच्यासारखे काम करण्यास प्रेरित करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल (४७) यांना या यादीत ४२ वे स्थान मिळाले आहे. यादीत दक्षिण कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी गव्हर्नर निकी हेले १७ व्या, तर अन्य एक भारतीय रेशम सौजानी २० व्या स्थानी आहेत.
सम-विषम योजनेद्वारे नवी दिल्लीतील प्रदूषण रोखण्याच्या उपायाबद्दल फार्च्युनने केजरीवाल यांचे नाव या यादीत समाविष्ट केले आहे. फॉर्च्युनने केजरीवाल यांची प्रशंसा करताना लिहिले आहे की, केजरीवाल यांनी वाहनांच्या धुरामुळे दिल्लीवर पसरणारी हवेची धुरकट चादर हटविण्यासाठी ‘सम-विषम’चा आराखडा सादरा केला तेव्हा अनेकांनी या योजनेच्या यशस्वीतेबाबत शंका उपस्थित केल्या होत्या.
जागतिक आरोग्य संघटनेने नवी दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हटले होते. सम-विषम योजनेअंतर्गत दिल्लीत सम आणि विषम नंबरच्या गाड्या रस्त्यावर आलटून-पालटून चालविण्यात आल्या. गेल्या जानेवारीत
सम-विषमचे चांगले परिणाम
मिळाले. (वृत्तसंस्था)