केजरीवाल, चिदंबरम, निरुपमविरोधात देशद्रोहाचा खटला ?
By admin | Published: October 6, 2016 11:30 AM2016-10-06T11:30:49+5:302016-10-06T11:34:22+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरपूर, दि.6 - सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरमधील जिल्हा कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचिकाकर्त्यांनी देशद्रोहाच्या खटल्या अंतर्गत तिघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जगन्नाथ साह असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. ते 'आप और हम' या नवीन पक्षाचे अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. 19 ऑक्टोबर रोजी यावरील सुनावणी होणार आहे.
आणखी बातम्या
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी या तिन्ही नेत्यांनी केली होती. या मागणीमुळे तिन्ही नेत्यांवर देशभरातून टीका होत आहे.अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराचे कौतुक केले, मात्र याचवेळी पुरावा सादर करण्याची मागणीही केली. तर दुसरीकडे पी.चिदंबरम आणि संजय निरुपम यांनी कारवाई केल्याबाबत शंका उपस्थित केली होती.