'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केजरीवालांचे नाव नाही

By admin | Published: November 13, 2014 06:39 PM2014-11-13T18:39:03+5:302014-11-13T18:39:03+5:30

प्रसिद्ध झालेल्या यादिमध्ये एकुण २२ उमेदवारांची नावे असून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव नाही.

Kejriwal did not name the first list of candidates, Kejriwal | 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केजरीवालांचे नाव नाही

'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केजरीवालांचे नाव नाही

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दिल्लीमध्ये होणा-या विधान सभा निवडणूकांसाठी आम आदमी पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादिमध्ये एकुण २२ उमेदवारांची नावे असून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव नाही. आम आदमी पक्षाने आनंद कुमार यांच्या नेतृत्वाअंतर्गत त्रिसदस्यीय समिती नेमली असून यासमितीमध्ये ऋषी व आशिष खेतान यांचा समावेश आहे. 
पहिल्या यादीत तिलक नगर मधून मधून जनरल सिंह यांना उमेदवारी देण्यात आली असून मालवीय नगरमध्ये सोमनाथ भारती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ग्रेटर कैलाश नगरमधून पुन्हा सौरभ भारद्वाज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाचे नेते संजय सिंह यांनी असे सांगितले की, आपच्या उमेदवारांबद्दल योग्य कारणांसह कुणाचीही तक्रार असल्यास शेवटच्या क्षणालाही आम्ही उमेदवारी रद्द करु. उमेदवारांना प्रचाराकरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून दुसरी यादी ही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले आहे. 
 
 
 

Web Title: Kejriwal did not name the first list of candidates, Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.