केजरीवाल सरकारने दिल्लीत मद्यपानासाठीची वयोमर्यादा घटवली, महसूल वाढीसाठी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:52 PM2021-03-22T17:52:23+5:302021-03-22T17:56:55+5:30

Kejriwal government has lowered the age limit for drinking : केजरीवाल सरकारने मद्यपानासाठी किमान वयोमर्यादा जाहीर केली असून, मद्याच्या नव्या दुकानांबाबतही धोरणात्मक निर्णयाची घोषणा केली आहे.

The Kejriwal government has lowered the age limit for drinking in Delhi, taking a decision to increase revenue | केजरीवाल सरकारने दिल्लीत मद्यपानासाठीची वयोमर्यादा घटवली, महसूल वाढीसाठी घेतला निर्णय

केजरीवाल सरकारने दिल्लीत मद्यपानासाठीची वयोमर्यादा घटवली, महसूल वाढीसाठी घेतला निर्णय

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (Kejriwal government) राज्याच्या मद्यपानविषयक धोरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केजरीवाल सरकारने मद्यपानासाठी किमान वयोमर्यादा जाहीर केली असून, मद्याच्या नव्या दुकानांबाबतही धोरणात्मक निर्णयाची घोषणा केली आहे. (drinking in Delhi) या निर्णयानुसार आता दिल्लीमध्ये मद्यपानासाठीचे किमान वय २५ वरून घटवून २१ वर्षे केले आहे.  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  (The Kejriwal government has lowered the age limit for drinking in Delhi, taking a decision to increase revenue)

याबाबतची घोषणा करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीमध्ये आता मद्यपान करण्यासाठीचे कायदेशीर वय २१ वर्षे करण्यात आले आहे. या वयाखालील व्यक्तींना मद्यपान करता येणार नाही. तसेच दिल्लीमध्ये सरकारी मद्यालयेही नसेल. तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कुठल्याही नव्या मद्यालयाला परवानगी दिली जाणार नाही. २१ वर्षांखालील व्यक्तींना मद्यपान होत असलेल्या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी नसेल, अशी घोषणा सिसोदिया यांनी केली आहे.  

दिल्लीमधील दारू माफिया आणि अवैध दारूचा धंदा चालवणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आता मद्याचे समान वितरण होईल. मात्र दिल्लीमध्ये मद्याचे कुठलेही नवे दुकार उघडले जाणार नाही. दिल्लीमध्ये मद्याची क्वालिटी चेक करण्यासाठी दिल्ली सरकार क्वालिटी चेकसाठी आपली एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार करेल, असेही मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 

Web Title: The Kejriwal government has lowered the age limit for drinking in Delhi, taking a decision to increase revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.