केजरीवाल यांच्यावर गुन्हा : मोदींवर निशाणा
By admin | Published: September 22, 2016 06:02 AM2016-09-22T06:02:08+5:302016-09-22T06:02:08+5:30
दिल्लीच्या महिला आयोगातील (डीसीडब्ल्यू) भरती प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या महिला आयोगातील (डीसीडब्ल्यू) भरती प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांच्यासह आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नावही या गुन्ह्यात नोंदविण्यात आले आहे.
त्यामुळे संपातलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगतानाच या कारस्थानामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले की, महिला आयोगातील प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेप्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरूनच एसीबीने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याची प्रतही त्यांनी वितरित केली. यात ज्ञात संशयित, अज्ञात आरोपीच्या स्वरूपात स्वाती मालीवाल यांच्यासह केजरीवाल यांचेही नाव आहे.
दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी मालीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)