मोदी विरोधात केजरीवाल-हार्दिक येणार एकत्र?
By admin | Published: October 16, 2016 10:10 AM2016-10-16T10:10:01+5:302016-10-16T10:10:01+5:30
केजरीवाल-हार्दिक एकत्र आल्यास गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. केजरीवाल गुजरातमध्ये समाजासाठी काय करू शकतात? हे त्यांनी आताच मांडावे असेही हार्दिकने त्याच्या निवेदनात म्हटले आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पाटीदार आरक्षण आंदोलनाचा प्रणेता हार्दिक पटेलने आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी हातमिळवण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. हार्दिकने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये केजरीवालांच्या गुजरात भेटीचे स्वागत केले आहे.
केजरीवाल-हार्दिक एकत्र आल्यास गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. केजरीवाल गुजरातमध्ये समाजासाठी काय करू शकतात? हे त्यांनी आताच मांडावे असेही हार्दिकने त्याच्या निवेदनात म्हटले आहे. जर हार्दिक-केजरीवाल एकत्र आल्यास भाजपाला ही विधानसभा नक्कीच जड जाणार आणि आम आदमी पक्षाची ताकद वाढणार यात काही शंका नाही. जर असं झाल्यास यंदा गुजरातमध्ये आपल्याला त्रिशंकू लढत पहायला मिळेल.
दरम्यान, केजरीवाल सध्या गुजरातच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, भाजपला लक्ष्य करण्यासाठी ते जाणीवपूर्वक पटेलांच्या बालेकिल्ल्यांना भेट देणार आहेत. पटेल समाज हा भाजपची हक्काची व्होटबँक म्हणून ओळखला जातो त्यालाच सुरुंग लावण्याचे नियोजन आम आदमी पक्षाने आखले आहे. हार्दिक पटेलची तुरुंगातून सुटका होताच सर्व राजकीय पक्षांनी त्याचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न चालविले आहे