प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवालांनी केली तातडीच्या उपायांची घोषणा
By Admin | Published: November 6, 2016 03:59 PM2016-11-06T15:59:44+5:302016-11-06T15:59:44+5:30
धुरक्यामुळे श्वास कोंडत असलेल्या दिल्लीच्या लोकांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपायांची घोषणा करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - राजधानीत वाढलेले प्रदूषण आणि दाटलेल्या धुरक्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत धुरक्यामुळे श्वास कोंडत असलेल्या दिल्लीच्या लोकांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपायांची घोषणा करण्यात आली .
दिल्ली सरकारच्या बैठकीत दिल्लीतील सर्व शाळा पुढचे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढच्या 5 दिवसांपर्यंत दिल्लीत सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धूळ उडू नये म्हणून सोमवारी दिल्लीतील रस्त्यांवर पाण्याचा शिडकावा करण्यात येणार आहे. पुढचे 10 दिवस दिल्लीत जनरेटर सुरू करण्यावर बंदी घलण्यात आली असून, बदरपूर प्लँटसुद्धा पुढचे 10 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दिल्लीत कचरा जाळण्यावर बंदी घालण्यात आली असून, 10 नोव्हेंबरपासून दिल्लीतील रस्त्यांवर व्हॅक्युम क्लिनिंग करण्यात येणार आहे. तसेच धुरक्यावर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या शक्यतेवर चाचपणी करण्यात आली.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या समस्येवर तोडगा शोधला पाहिजे असे सांगितले.
Landfill sites fire to be bulldozed; People should stay at home as much as they can, work from home: CM Kejriwal pic.twitter.com/Nr8pp8jvS5
— ANI (@ANI_news) November 6, 2016
Cabinet discussed about artificial rain and now needs Centre's support; Crop-burning will continue and so can't expect relief soon: Delhi CM pic.twitter.com/prBYw1b33j
— ANI (@ANI_news) November 6, 2016