दिल्लीत अरविंद केजरीवालांकडून 'मुख्यमंत्री आवास योजने'ची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:31 PM2019-12-25T15:31:38+5:302019-12-25T15:31:55+5:30
केजरीवाल यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यांनी आपल्या सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मंगळवारी मुख्यमंत्री आवास योजना सुरू केली आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल सरकारकडून राज्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 65 हजार कुटुंबांना मंगळवारी प्रमाणपत्र देण्यात आले असून लवकरच त्यांना पक्की घरे देण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
आज 65,000 झुग्गी परिवारों को सर्टिफिकेट दिया गया। बाक़ी सर्वे चल रहा है। झुग्गी के पड़ोस में पक्का मकान बनाकर दिया जाएगा और तब तक उनकी झुग्गी को तोड़ा नहीं जाएगा। दिल्ली के हर नागरिक के लिए इज्जत की जिंदगी मिल सके इसलिए हम हर प्रयास कर रहे हैं। pic.twitter.com/w9UeZmTAOM
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 24, 2019
दरम्यान केजरीवाल यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यांनी आपल्या सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला आहे.