Delhi Election 2020 Results : 'केजरीवाल देशद्रोही नसून कट्टर देशभक्त, दिल्लीकरांनी दाखवून दिलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 01:10 PM2020-02-11T13:10:16+5:302020-02-11T13:10:24+5:30
Delhi Assembly Election 2020 Results News : दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा
नवी दिल्ली - दिल्लीतील जनतेनं आपल्या मुलाला निवडून दिलं आहे. दिल्लीकरांची सेवा केल्यामुळेच हा विजय मिळाला आहे. भाजपाने, सत्ता, पैसा आणि दिग्गज मंत्र्यांची फौज दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी 'आप'ला माणूस निवडून दिल, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी म्हटलंय.
दिल्ली विधानसभेत आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंह यांनी हा विजय जनतेचा असल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. दिल्लीकरांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे आभार, असेही संजय सिंह यांनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या भाषणाता नाव न घेता केजरीवाल यांना देशद्रोही असे म्हटले होते. त्यास, सिंह यांनी निकालानंतर उत्तर दिलंय. दरम्यान, मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेनं मतदान प्रक्रियेतून भाजपाला देशद्रोही घोषित केल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
दिल्ली के 2 करोड़ परिवार के लोगों ने बता दिया उनका बेटा @ArvindKejriwal आतंकवादी नही कट्टर देश भक्त है प्रचंड बहुमत से जीत देने के लिये दिल्ली की महान जनता को सिर झुकाकर सत्-सत् नमन। pic.twitter.com/nrS3AO6rdZ
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) February 11, 2020
दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळेच आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपच्या दिग्गजांनी विजयी आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.