केजरीवालांनी केले धरणे आंदोलन; सीसीटीव्ही प्रकल्प अडवल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:49 AM2018-05-15T06:49:47+5:302018-05-15T06:49:47+5:30

दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे सरकार व लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील संघर्ष सोमवारी रस्त्यावर आला

Kejriwal organized a protest rally; Accused of blocking CCTV project | केजरीवालांनी केले धरणे आंदोलन; सीसीटीव्ही प्रकल्प अडवल्याचा आरोप

केजरीवालांनी केले धरणे आंदोलन; सीसीटीव्ही प्रकल्प अडवल्याचा आरोप

Next


दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे सरकार व लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील संघर्ष सोमवारी रस्त्यावर आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदारांनी गव्हर्नर कार्यालयासमोर भाजपाच्या दडपणाखाली हा प्रकल्प अडवू नका, असे आवाहन करण्यासाठी धरणे धरले.
लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या कार्यालयाबाहेर तैनात पोलीस अधिकाऱ्यांनी केजरीवाल व त्यांचे मंत्री बैजल यांची भेट घेऊ शकतात, परंतु आपच्या आमदारांना तुमच्यासोबत जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितल्यानंतर केजरीवाल व त्यांच्या सहकाºयांनी निषेध आंदोलन सुरू केले. थोड्याच वेळात केजरीवाल, मंत्री व आमदार व आपच्या समर्थकांनी बैजल यांच्या कार्यालयापासून जेमतेम १०० मीटर्सवर धरणे आंदोलन सरु केले.

Web Title: Kejriwal organized a protest rally; Accused of blocking CCTV project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.