राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:07 AM2022-03-11T06:07:18+5:302022-03-11T06:07:35+5:30

गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले.

Kejriwal strong in national politics; they did what the major regional leaders did not get | राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले

राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले

Next

सुरेश भुसारी  
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीसह पंजाबमध्येही ऐतिहासिक विजय संपादन करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणातील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. मोदी सरकारच्या विरोधातील एक नवा चेहरा राष्ट्रीय राजकारणात आता अधिक दमदारपणे पाऊल टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले. त्यांची मनीषा नेहमीच राष्ट्रीय राजकारण करण्याची असल्याचे लपून राहिले नाही. यासाठी त्यांनी २०१४ मध्ये थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून आव्हान दिले होते. परंतु, तेव्हा त्यांची ही चाल अंगलट आली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य देणे बंद करून इतर राज्यांमध्ये आपचे जाळे वाढविण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले लक्ष्य पंजाबमध्ये होते. 

पंजाबमध्ये ४ खासदार निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार लढत दिली. तेव्हा केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेने आपचा घोडा अडला. 
आता मात्र पंजाबमध्ये आधीच शीख मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करून आपल्यावरील आक्षेप फेटाळून
लावले. 

प्रादेशिक नेत्यांना मागे टाकले
n    दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करून केजरीवाल यांनी देशातील प्रादेशिक इतर नेत्यांपुढे मोठी मजल मारली आहे.
n    पुढील लक्ष्य लोकसभा असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पंजाबमधील आपच्या या ऐतिहासिक यशाने केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिक दृढ झाले आहे.

शब्दांना येणार धार
n    ममता बॅनर्जी, शरद पवार, के. चंद्रशेखर राव, जगन रेड्डी, एम. के. स्टालिन, नवीन पटनायक या प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते केजरीवाल यांनी करून दाखविले आहे. 
n    यामुळे केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील शब्दांना भविष्यात अधिक धार येणार आहे.

Web Title: Kejriwal strong in national politics; they did what the major regional leaders did not get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.