केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

By मोरेश्वर येरम | Published: December 17, 2020 05:29 PM2020-12-17T17:29:46+5:302020-12-17T17:31:51+5:30

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे."

Kejriwal tore up a copy of the Agriculture Act in the Assembly | केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली, म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. 

"केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या सरकारने इंग्रजांपेक्षाही खालची पातळी गाठण्याचं काम करु नये", अशी जोरदार टीका केजरीवाल यांनी केली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही केजरीवालांनी निशाणा साधला. "आदित्यनाथ यांनी बरेली येथील रॅलीमध्ये लोकांना कृषी कायद्याचे फायदे सांगत होते. तुमची जमीन जाणार नाही, बाजार बंद होणार नाही असं सांगत होते. पण या कायद्याने फायदा काय होणार आहे ते भाजपवाल्यांनी सांगावं. देशात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येईल हा एकच रेटा भाजपवाले लावत आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

"केवळ हवेतल्या गोष्टी करुन काही उपयोग नाही. खरंतर शेतकरी नव्हे, तर भाजपवालेच गोंधळलेले आहेत. भाजपवाल्यांना अफीम देण्यात आली आहे", असा शाब्दिक वार केजरीवाल यांनी केला. 

कोरोना काळात अद्यादेश का?
"सुप्रीम कोर्टात आमच्या वकीलाने कृषी कायद्याप्रकरणी केंद्र सरकारच दोषी असल्याचं म्हटलं. कोरोना काळात अद्यादेश जारी करण्याची काय गरज होती? राज्यसभेतही कोणतंही मतदान न घेता तिनही कायदे मंजूर कसे करुन घेतले गेले?", असे सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी कृषी कायदे हे भाजपने निवडणुकीचा फंड जमा करण्यासाठी लागू केले असल्याचा आरोप केला.
 

Web Title: Kejriwal tore up a copy of the Agriculture Act in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.