‘केजरीवालांचा कार फ्री डे’
By admin | Published: October 23, 2015 03:41 AM2015-10-23T03:41:21+5:302015-10-23T03:41:21+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्गापर्यंत सायकल फेरी काढून नवी दिल्लीत गुरुवारी पहिला ‘कार फ्री डे’ साजरा
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्गापर्यंत सायकल फेरी काढून नवी दिल्लीत गुरुवारी पहिला ‘कार फ्री डे’ साजरा करण्यात आला. महिलांसह शेकडो लोक या फेरीत सहभागी झाले होते.
‘कार फ्री डे’ पाळण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वापराकरिता लोकांना प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. सायकल फेरीत केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, इतर कॅबिनेट मंत्री, मुख्य सचिव व नोकरशहा सहभागी झाले होते.
केजरीवाल सायकलवरून लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्ग येथे गेले व तेथे त्यांनी फेरीत सहभागी दिल्लीकरांना सायकल चालविणे सवयीचे करण्याचे आवाहन केले. लोकांनी आपली वाहने सोडून सार्वजनिक वाहूतक सेवेचा वापर करावा. दिल्लीत प्रदूषण कमालीचे वाढत असल्यामुळे सायकल प्रवासाची आवश्यकता असून, सायकल चालविणे आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आपणास मधुमेह असून सायकल चालविण्याचा तंदुरुस्तीसाठी उपयोग होतो, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे रस्ते सुरक्षित बनवा, असे आवाहनही त्यांनी केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)