केजरीवाल यांचे मिशन पुनर्बांधणी

By admin | Published: June 8, 2014 07:38 PM2014-06-08T19:38:14+5:302014-06-08T19:39:59+5:30

आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी आणि त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये मिशन पुनर्बांधणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kejriwal's Mission Rebirth | केजरीवाल यांचे मिशन पुनर्बांधणी

केजरीवाल यांचे मिशन पुनर्बांधणी

Next

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ८- आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी आणि त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये मिशन पुनर्बांधणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बूथपातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पक्षाची पूनर्बांधणी करणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. 
गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला होता. यापार्श्वभूमीवर दिल्लीत आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केजरीवाल यांनी पक्षाची पूनर्बांधणी करणार असल्याचे सांगितले. यासाठी आपमध्ये पुढील वर्षभरासाठी मिशन विस्तार राबवण्यात येणार असून यात पक्षाच्या राष्ट्रीय स्तरापासून ते जिल्ह्यातील बूथ पातळीपर्यंत बदल केले जातील. पक्षाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन आपचा प्रचार करतील. नवीन लोकांना पक्षाशी जोडतील अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. फेरबदल करताना जुन्या व नवीन पदाधिका-यांचा ताळमेळ घालून पक्षाची बांधणी करु असे त्यांनी स्पष्ट केले. 
नवनियुक्त मोदी सरकारने गॅसच्या दरात वाढ करू नये, संरक्षण क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीस परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. आपच्या काळात दिल्लीत वीज व पाणी चोवीस तास उपलब्ध होते. मात्र आता तिथे भीषण वीजटंचाई व पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय असा टोलाही त्यांनी लगावला. 
 

Web Title: Kejriwal's Mission Rebirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.