केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
By admin | Published: January 22, 2017 01:39 AM2017-01-22T01:39:14+5:302017-01-22T01:39:14+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकरणात समज दिली आहे. गोव्यात साखळी येथील सभेत त्यांनी
पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकरणात समज दिली आहे. गोव्यात साखळी येथील सभेत त्यांनी मतदारांना, इतर पक्षांनी पैसे दिल्यास ते स्वीकारण्याचे धक्कादायक आवाहन केले होते.
मतदारांना पैसे घेण्याचे आवाहन करून त्यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भाजपाने केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आॅनलाइन पद्धतीनेही तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांना पैसे स्वीकारण्याचे केलेले आवाहन केजरीवाल यांना महागात पडले. निवडणूक प्रचारात आचारसंहिता भंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अन्यथा आयोगाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे आयोगाने त्यांना सुनावले. हा आदेश चुकीचा आहे. मी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला नाही. आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)