CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:41 PM2024-04-04T14:41:02+5:302024-04-04T14:41:47+5:30

शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अरविंद केजरीवालांचा फोटो लावण्यात आला आहे.

Kejriwal's photo with Bhagat Singh and Dr. Ambedkar's photo; Another letter sent from prison | CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत. मात्र तुरुंगातूनच ते पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या माध्यमातून जनतेला आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांना आपले संदेश पाठवत आहेत. आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अरविंद यांनी दिलेला संदेश शेअर केला.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली, पण त्यांच्या पाठीमागे असलेल्या दृष्याने सर्वांनाच चकीत केले. सुनीता यांच्या पाठीमागे भिंतीवर नेहमीप्रमाणे शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. पण, त्यांच्या फोटोसोबतच अरविंद केजरीवाल यांचाही फोटो लावण्यात आला . या फोटोद्वारे आप कोणता संदेश देऊ इच्छि आहे, हे त्यांनाच माहित. 

दिल्लीकरांना कोणतीही अडचण येऊ नये
दरम्यान, केजरीवालांनी आपल्या संदेशात म्हटले की, मी तुरुंगात आहे, पण माझ्या एकाही दिल्लीकराला अडचण येता कामा नये. प्रत्येक आमदाराने दररोज त्या त्या भागात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या. कोणालाही काही समस्या असेल, तर तात्काळ सोडवाव्यात. दिल्लीतील 2 कोटी जनता माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

15 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 2 तासांच्या चौकशीनंतर 21 मार्च रोजी ईडीने त्यांच्या घरातून अटक केली होती. दरम्यान, दिल्ली सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये मद्य धोरण आणले, त्यानंतर लगेचच 2022 मध्ये त्यात अनियमितता आढळून आली. माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि सप्टेंबर 2022 पासून या प्रकरणाशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, अरविंद केजरीवाल 15एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या तीन मित्रांना त्यांना तुरुंगात भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Kejriwal's photo with Bhagat Singh and Dr. Ambedkar's photo; Another letter sent from prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.