मॉडेल होण्यासाठी आपल्याच घरी केली चोरी

By admin | Published: April 26, 2017 08:10 AM2017-04-26T08:10:09+5:302017-04-26T08:10:09+5:30

मॉडेल होण्याची आपली इच्छा पुर्ण करण्यासाठी एका तरुणीने आपल्याच घरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे

Kelly theft at home to become a model | मॉडेल होण्यासाठी आपल्याच घरी केली चोरी

मॉडेल होण्यासाठी आपल्याच घरी केली चोरी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - मॉडेल होण्याची आपली इच्छा पुर्ण करण्यासाठी एका तरुणीने आपल्याच घरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने आपल्या घरातील तिजोरीवर हात साफ करत दागिने आणि रोख तीन लाख रुपयांची चोरी केली. घरातून चोरी केलेला सर्व मुद्देमाल तिने आपल्या दोन मित्रांच्या हवाली केला होता. पोलिसांनी चोरीचा उलगडा करत 19 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे. 
 
विकास आणि अक्षय अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घरातून चोरी करण्यात आलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. विकास एलएलबीचा विद्यार्थी आहे. तरुणीच्या भावाचा तो मित्र असून, अक्षय तरुणीचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
डीसीपी अजित कुमार सिंघला यांनी सांगितलं की, "हर्ष विहार परिसरात राहणा-या साहब सिंह यांनी 16 एप्रिल रोजी फोन करुन आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार केली होती. आपल्या घरातील 15 ते 20 तोळं सोनं आणि तीन लाख 800 रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास केला असता या चोरीत घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय आला. तपासादरम्यान विकास नावाच्या तरुणावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची संपुर्ण घटना सविस्तरपणे सांगितली". 
 
साहब सिंह यांची मुलगी आपली मैत्रिण असून तिला मॉडेल होण्याची इच्छा आहे. यासाठी तिला पैशांची गरज होती. पण तिच्या घरचे तिला पाठिंबा देत नव्हते अशी माहिती आरोपीने दिली. यानंतर मुलीने पैशांसाठी आपल्याच घऱी चोरी करण्याची योजना आखली होती. आरोपीच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 
 

Web Title: Kelly theft at home to become a model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.