Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:46 PM2022-05-05T15:46:31+5:302022-05-05T15:46:41+5:30

Kendriya Vidyalaya: गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत प्रवेश देला जाणार आहे.

Kendriya Vidyalaya: Kendriya Vidyalaya's big decision, free admission to children orphaned by corona | Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश

Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश

googlenewsNext

Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत प्रवेश देला जाणार आहे. पीएम केअर चाइल्ड स्कीम अंतर्गत मुलांना त्याचा लाभ मिळेल. प्रत्येक केंद्रीय विद्यालयात जास्तीत जास्त 10 आणि प्रत्येक वर्गात दोन मुलांना प्रवेश दिला जाईल. वायुसेना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एसके श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम केअर योजनेंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे शिक्षण शुल्क, इतर सर्व निधी सरकार उचलेल. या योजनेंतर्गत प्रवेश घेतलेल्या मुलांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर शाळांना पाठवली जाईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. दरम्यान, केंद्रीय विद्यालय संघटनेने इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रवेशासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पालक आणि विद्यार्थी KVS च्या अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन मार्गदर्शक तत्त्वे वाचू शकतात. 

खासदार कोट्यातील प्रवेश रद्द
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शैक्षणिक 2022-23 मध्ये केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून यापुढे प्रवेश होणार नाहीत. तसेच, केंद्रीय विद्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना KVS मध्ये प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी त्यांना कोणतीही एंट्रस देण्याची गरज नाही. पण इयत्ता 9वीसाठी एंट्र्स द्यावा लागेल. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या म्हणण्यानुसार, सेवेत असताना मृत्यू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळू शकणार आहे.

Web Title: Kendriya Vidyalaya: Kendriya Vidyalaya's big decision, free admission to children orphaned by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.