Kerala Floods : जिगरवाला भिकारी, भीक मागून कमावलेली रक्कम दिली पूरग्रस्तांना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 04:07 PM2018-09-03T16:07:44+5:302018-09-03T16:09:10+5:30
कोट्टयम येथील रहिवासी मोहनन यांनी चार किमीचा प्रवास करुन इराट्टूपेटा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष टीए रशीद यांचे घर गाठले. त्यावेळी, मोहनन भीक मागण्यासाठीच
मुंबई - केरळ पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. केरळमधील पीडितांसाठी शाळेचे विद्यार्थी, कालेजचे तरुण, सामाजिक संस्था आणि काही गणेश मंडळेही पुढाकार घेत आहेत. राजकीय नेते, उद्योजक, खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वचजण या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, केरळच्या मदतीसाठी एका जिगरबाज भिकाऱ्यानेही आपली झोळी रिकामी केली आहे. या भिकाऱ्याने दिवसभर भीक मागून कमावलेली 94 रुपयांची रक्कम केरळच्या मदतीसाठी दिली आहे.
केरळमध्ये आलेल्या महापुरात 300 पेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. लाखोंचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानंतर, केरळचे मुख्यंमंत्री पिनराई विजयन यांनी देशवासियांना मदतीचे आवाहन केले. तसेच केरळच्या पुनर्वसनासाठी 2600 कोटींची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यानंतर, देशभरातून केरळच्या मदतीसाठी पुढाकार उचलण्यात आला. कुठे एखाद्या चिमुकल्याने पिग्गी बँकेचे पैसे दिले, तर कुणी लग्नाचा खर्च टाळून केरळला मदत केली. कुणी महिन्याची पगार केरळसाठी दिली, तर कुणी केरळसाठी रस्त्यावर फिरून फंड जमा केला. मात्र, केरळच्या मदतीसाठी चक्क एका भिकाऱ्याने पुढाकार घेतल्याचे दिसून आले. कोट्टयम येथील रहिवासी मोहनन यांनी चार किमीचा प्रवास करुन इराट्टूपेटा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष टीए रशीद यांचे घर गाठले. त्यावेळी, मोहनन भीक मागण्यासाठीच आला असेल, असा समज मोहनन यांचा झाला. त्यामुळे रशीद यांनी मोहननला 20 रुपयांची भीक दिली. मात्र, भिकारी मोहनने त्यांच्याकडील पैसे न घेता, आपल्याजवळील पैस मोजण्यास सुरुवात केली. त्यामुळे रशीद यांनाही आश्चर्य वाटले. रशीद यांनी याबाबतची पूर्ण पोस्ट फेसबुकवरुन शेअर केली आहे. मोहनन याने भीक मागून कमावलेली 94 रुपयांची रक्कम माझ्याकडे दिले आणि केरळच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याची विनंती केली. तसेच एका दुर्घटनेमुळे माझे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे मी केवळ एवढीच मदत करु शकतो, असेही मोहननने यावेळी म्हटले. मोहनच्या या जिगरबाज वृत्तीला पाहून रशीद यांनाही गहिवरुन आले. तसेच त्यांनी मोहनन याच्या दर्यादिलीचे कौतूकही केले.