धक्कादायक! सावत्र मुलीवर बलात्कार, वडिलांना 40 वर्षांची शिक्षा, कोर्टाने ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:21 PM2023-01-18T16:21:12+5:302023-01-18T16:23:06+5:30

केरळ न्यायालयाने एका व्यक्तीला स्वत:च्या अल्पवयीन सावत्र मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्या व्यक्तीला 40 वर्षांची शिक्षा सुनावली. 

kerala crime 41 year old father rape his step daughter jailed for 40 years | धक्कादायक! सावत्र मुलीवर बलात्कार, वडिलांना 40 वर्षांची शिक्षा, कोर्टाने ठोठावला दंड

धक्कादायक! सावत्र मुलीवर बलात्कार, वडिलांना 40 वर्षांची शिक्षा, कोर्टाने ठोठावला दंड

googlenewsNext

केरळ न्यायालयाने एका व्यक्तीला स्वत:च्या अल्पवयीन सावत्र मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्या व्यक्तीला 40 वर्षांची शिक्षा सुनावली.  इडुक्की उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 

इडुक्की फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश टीजी वर्गीस यांनी मंगळवारी (17 जानेवारी) एका 41 वर्षीय व्यक्तीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत  40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. वेगवेगळ्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा एकाच वेळी चालते, त्यामुळे आरोपीला फक्त 10 वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे.

नव्या EVM मशीनवर होणार मतदान, 'या' सरकारी कंपन्यांना मिळाली १३३५ कोटींची ऑर्डर!

फिर्यादीने सांगितले की, त्या व्यक्तीने सावत्र मुलीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता. न्यायालयाने दोषीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यासोबतच पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला ५० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले होते. फिर्यादीने निदर्शनास आणून दिले. हा गुन्हा POCSO कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी 2017 मध्ये घडला होता, त्यामुळे दोषीला फक्त 10 वर्षांची शिक्षा देण्यात आली. 2019 मध्ये कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर या गुन्ह्यांमध्ये किमान 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: kerala crime 41 year old father rape his step daughter jailed for 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.