केरळ : मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू

By admin | Published: April 10, 2016 07:37 AM2016-04-10T07:37:02+5:302016-04-10T14:54:31+5:30

कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर, सुमारे २०० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत

Kerala: Death of 108 devotees killed in a fire in the temple due to crackers | केरळ : मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू

केरळ : मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

केरळ,दि. १० - कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  तर या दुर्घटनेत सुमारे 200 पेक्षा अधिक भाविक जखमी झालेत. पहाटे ३ च्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. नवरात्रोस्तवामुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. त्यावेळी ही आग दुर्घटना घडली. अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवल्याचा प्रयत्न करत असून, भाविकांच्या बचावकार्यासाठी हवाई दलाच्या 4 हेलिकॉप्टरसह एमआय-17 हे विशेष हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. या भीषण आगीत जखमी झालेल्यांना जवळच्याच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येतं आहे.  दुर्घटनेतील मृत्युमुखींचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. बचावकार्याच्या माहितीसाठी 0474-2512-344, 949760778, 949730869 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

 

पुत्तिंगल मंदिराने फटाक्यांचा साठा करण्यासाठी परवानगी घेतली नव्हती,न्यायमूर्तींमार्फत आगीची चौकशी होणाार असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी दिली. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभीनेता रितेश देशमुख, सदानंद गौडा यांनी आगीबाबत ट्विट करुन दुख व्यक्त केले आहे.तर ११ वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देणार आहेत.

 

 
दरम्यान, पारावूर मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांमुऴे ही आग लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, तर या आगीच्या दुर्घटनेतील मृत्यूमुखींचा आकडा वाढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.

 

WATCH: Moment when fire broke at Puttingal temple fire in Kollam (Kerala) due to fireworks display, 75 dead.https://t.co/xXtBnZkgWX

— ANI (@ANI_news) April 10, 2016

 

 

मंदिरात रात्री १२ वाजता आतषबाजी सुरु झाली होती आणि पहाटे ४ पर्यंत सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३० वाजता आग लागली. मात्र, कुणालाही आग लागल्याचं कळलं नाही. आगीनं भीषण रुप धारण केल्यानंतर सर्वांची धावपळ सुरु झाली. या आगीत देवास्वोम बोर्ड बिल्डिंग जळून खाक झाली आहे.



राज्याचे गृहमंत्री चेन्नीथाला घटनास्थळी पोहोचणार असून आरोग्यमंत्री व्हीएस शिवकुमार यांनी त्रिवेंदरम मेडिकल कॉलेज आणि कोल्लम जनरल हॉस्पिटलमध्ये सर्व आवश्यक उपचार पुरवण्याचे आधेश दिले आहेत. या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी सर्व कार्यक्रम रद्द करुन घटनास्थळाकडे रवाना होणार आहेत.


अतषबाजीची परंपरा


पुत्तिंगल देवीच्या मंदिरातील आग फटाक्यांच्या आतषबाजीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पुत्तिंगल देवीच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करणं ही सर्वसामान्य बाब असून नव्या वर्षानिमित्त इथे आतषबाजी केली जाते. तशी परंपराच आहे. १४ एप्रिलला मल्याळम नववर्ष सुरु होतं. त्यानिमित्तानंच ही आतषबाजी केली जाते.

Web Title: Kerala: Death of 108 devotees killed in a fire in the temple due to crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.